Bnss कलम ३२८ : टाकसाळीच्या अधिकाऱ्यांचा साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३२८ :
टाकसाळीच्या अधिकाऱ्यांचा साक्षीपुरावा :
१) जो दस्तऐवज केंद्र शासन अधिसूचनेद्वारे यासंबंधात विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही टाकसाळीच्या किंवा कोणत्याही नोटा छापणाऱ्या मुद्रणालयाच्या किंवा नियंत्रक, मुद्रांक व लेखनसामग्री यांचे कार्यालय धरून कोणत्याही सिक्युरिटी प्रिटिंग प्रेसच्या, किंवा कोणत्याही न्यायसहाय्यक विभागाच्या, किंवा न्यायसहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा विभागाच्या राजपत्रित अधिकारीअधिकाऱ्याकडे, किंवा हरकत घेतलेल्या दस्तऐवजांच्या कोणत्याही शासकीय तपासनीसाकडे हरकत घेतलेल्या दस्तऐवजांच्या कोणत्याही राज्य तपासनीसाकडे या संहितेखालील कोणत्याही कार्यवाहीच्या ओघात तपासणीसाठी आणि अहवालासाठी रीतसर सादर केलेल्या कोणत्याही बाबीसंबंधीचा किंवा वस्तूसंबंधीचा त्याच्या सहीचा अहवाल असल्याचे दिसत असेल, असा कोणताही दस्तऐवज, त्या अधिकाऱ्याला साक्षीदार म्हणून बोलावलेले नसले तरीही, या संहितेखालील कोणत्याही चौकशीत, संपरीक्षेत किंवा अन्य कार्यवाहीत पुरावा म्हणून वापरता येईल.
२) न्यायालयाला योग्य वाटल्यास, ते अशा कोणत्याही अधिकाऱ्याला समन्स पाठवून त्याच्या अहवालाच्या विषयवस्तूसंबंधात त्याची साक्षतपासणी करू शकेल.
परंतु, अशा कोणत्याही अधिकाऱ्याला अहवाल ज्यावर आधारित असेल असे कोणतेही अभिलेख हजर करण्याबद्दल समन्स पाठवले जाणार नाही.
३) भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३ याची कलमे १२९ व १३० च्या उपबंधांस बाध न येता कोणत्याही टाकसाळीच्या किंवा कोणत्याही नोटा छापणाऱ्या मुद्रणालयाच्या किंवा कोणत्याही सिक्युरिटी प्रिटिंग प्रेसच्या किंवा कोणत्याही न्यायसहाय्यक विभागाच्या महाव्यवस्थापकाच्या किंवा कोणत्याही प्रभारी अधिकाऱ्याच्या किंवा न्याय सहाय्यक प्रयोगशाळेच्या किंवा हरकत घेतलेल्या दस्तऐवजांच्या शासकीय तपासनीस संघटनेच्या किंवा हरकत घेतलेल्या दस्तऐवजांच्या राज्य तपासनीस संघटनेच्या कोणत्याही प्रभारी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय अशा कोणत्याही अधिकाऱ्याला,
(a) क) (अ) अहवाल ज्यावर आधारित असेल अशा अप्रकाशित अधिकृत अभिलेखांवरून मिळवलेला कोणताही पुरावा देण्याची, किंवा
(b) ख) (ब) त्या बाबींच्या किंवा वस्तूच्या तपासणीच्या ओघात त्याने लावलेल्या कोणत्याही कसोटीने स्वरूप किंवा तपशील उघड करण्याची मुभा दिली जाणार नाही.

Leave a Reply