भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३२२ :
पक्षकारांना साक्षीदारांची साक्षतपासणी घेता येईल :
१) या संहितेखालील ज्या कोणत्याही कार्यवाहीत आयोगपत्र काढलेले असेल त्या कार्यवाहीतील पक्षकार आयोगपत्र निदेशित करणाऱ्या न्यायालयाला किंवा दंडाधिकाऱ्याला वादप्रश्नाशी संबंध्द वाटतील अशी आपापली पुरशीस लेखी स्वरूपात पाठवू शकेल आणि दंडाधिकाऱ्याने किंवा न्यायालयाने किंवा आयोगपत्र ज्याला निदेशून काढले किंवा ज्याच्याकडे त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सोपवले आहे त्या दंडाधिकाऱ्याने अशा पुरशिसीवरून साक्षीदाराची साक्षतपासणी करणे कायदेशीर असेल.
२) अशा कोणत्याही पक्षकाराला वकिलामार्फ त किंवा पक्षकार हवालतीत नसेल तर जातीने अशा दंडाधिकाऱ्यासमोर, न्यायालयासमोर किंवा अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहता येईल व उक्त साक्षीदाराची साक्षतपासणी, व फफेरतपासणी करता येईल.