Bnss कलम ३१ : दंडाधिकाऱ्यांना व पोलिसांना जनतेने केव्हा सहाय्य करायचे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३१ :
दंडाधिकाऱ्यांना व पोलिसांना जनतेने केव्हा सहाय्य करायचे :
प्रत्येक व्यक्ती ज्या दंडाधिकाऱ्याने किंवा पोलीस अधिकाऱ्याने-
(a) क) (अ) जिला अटक करण्यास असा दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी प्राधिकृत असेल अशा अन्य कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेण्याच्या कामी किंवा ती निसटून जाण्यास प्रतिबंध करण्याच्या कामी ; अथवा
(b) ख) (ब) शांताताभंगास प्रतिबंध किंवा त्याचे दमन करण्याच्या कामी; अथवा
(c) ग) (क) कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेस कोणताही क्षती पोचवण्याच्या प्रयत्नास प्रतिबंध करण्याच्या कामी, वाजवीरीत्या तिची मदत मागितली असेल तर त्याला मदत करण्यास बांधलेली असते.

Leave a Reply