Bnss कलम ३१४ : आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३१४ :
आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे :
१) जेव्हाकेव्हा आरोपीला न समजणाऱ्या भाषेत कोणतीही साक्ष देण्यात आलेली असेल व तो न्यायालयात जातीने उपस्थित असेल तेव्हा, त्याला समजणाऱ्या भाषेत ती साक्ष त्याला खुल्या न्यायालयात भाषांतर करून सांगण्यात येईल.
२) जर तो वकिलामार्फ त उपस्थित राहिला आणि न्यायालयाच्या भाषेहून अन्य भाषेत व वकिलाला न समजणाऱ्या भाषेत साक्ष दिली गेली तर, ती साक्ष अशा वकिलाला न्यायालयाच्या भाषेत भाषांतर करून सांगितली जाईल.
३) जेव्हा रीतसर शाबितीच्या प्रयोजनार्थ कागदपत्र ठेवले जातील तेव्हा, त्यांपैकी आवश्यक वाटेल तेवढयाच भागाचे भाषांतर करणे हे न्यायालयाच्या विवेकाधीन असेल.

Leave a Reply