भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३११ :
सत्र न्यायालयापुढील संपरीक्षेतील अभिलेख :
१) सत्र न्यायालयापुढील सर्व संपरीक्षांमध्ये प्रत्येक साक्षीदाराची जसजशी साक्षतपासणी केली जाईल, तसतशी त्याची साक्ष पीठासीन न्यायाधीश स्वत: अथवा खुल्या न्यायालयात तोंडी मजकूर सांगून, अथवा निदेशानुसार व देखरेखीखाली, त्याने या संबंधात नियुक्त केलेला न्यायालयाचा अधिकारी लेखी उतरवून घेत जाईल.
२) अशी साक्ष सर्वसामान्यपणे हकीकतीच्या रूपाने उतरून घेण्यात येईल, पण पीठासीन न्यायाधीशाला स्वविवेकानुसार अशी संपूर्ण साक्ष किंवा तिचा कोणताही भाग प्रश्नोत्तराच्या रूपात उतरून घेता येईल किंवा घेण्याची तजवीज करता येईल.
३) याप्रमाणे उतरून घेतलेल्या साक्षीवर पीठासीन न्यायाधीश स्वाक्षरी करील व ती अभिलेखाचा भाग होईल.