Bnss कलम ३०९ : समन्स खटल्यामधील चौकशीचे अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३०९ :
समन्स खटल्यामधील चौकशीचे अभिलेख :
१) दंडाधिकाऱ्यासमोर संपरीक्षा केल्या जाणाऱ्या व सर्व समन्स- खटल्यांमध्ये, कलमे १६४ ते १६७ (दोन्ही धरून) याखालील सर्व चौकशीमध्ये व संपरीक्षेच्या ओघात होणाऱ्या कार्यवाहीव्यतिरिक्त कलम ४९३ खालील अन्य सर्व कार्यावाहीमध्ये प्रत्येक साक्षीदाराची साक्षतपासणी जसजशी होत जाईल तसतसे दंडाधिकारी न्यायालयाच्या भाषेत त्यांच्या साक्षीच्या सारांशाचे टिप्पण करीत जाईल.
परंतु, जर दंडाधिकारी स्वत:असे टिप्पण करण्यास असमर्थ असेल तर तो आपल्या असमर्थतेचे कारण नमूद केल्यानंतर, असे टिप्पण खुल्या न्यायालयात आपण तोंडी सांगितलेल्या मजकूराबरहुकुम लेखी करवून घेईल.
२) अशा टिप्पणावर दंडाधिकारी स्वाक्षरी करील व ते टिप्पण अभिलेखाचा भाग होईल.

Leave a Reply