भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३०६ :
कारागृहातील साक्षीदाराच्या साक्ष तपासणीसाठी आयोगपत्र काढण्याचा अधिकार :
या प्रकरणाचे उपबंध, कारागृहात बंदिवान किंवा स्थानबद्ध केलेल्या कोणत्याही व्यक्तीची साक्षीदार म्हणून साक्षीतपासणी करण्यासाठी कलम ३१९ खाली आयोगपत्र काढण्याच्या न्यायालयाच्या अधिकाराला बाधक असणार नाहीत; आणि २५ व्या प्रकरणाचा भाग (ख) चे उपबंध आयोगापत्रावरून अन्य कोणत्याही व्यक्तीच्या होणाऱ्या साक्षतपासणीच्या संबंधात जसे लागू आहेत तसे ते कारागृहातील अशा कोणत्याही व्यक्तीची आयोगापत्रावरून साक्षतपासणी करण्याच्या संबंधात लागू असतील.