भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३०४ :
विवक्षित संभाव्य प्रसंगी कारागृहाच्या अंमलदार अधिकाऱ्यांनी आदेशांचे पालन करण्यापासून परावृत्त राहणे :
कलम ३०२ खाली जिच्याबाबत आदेश काढलेला असेल ती व्यक्ती जर —
(a) क) (अ) आजारामुळे किंवा विकलतेमुळे कारागृहातून हलवता येण्यासारखी नसेल तर, किंवा
(b) ख) (ब) संपरीक्षा होण्यासाठी हवालतीत ठेवलेली असेल अथवा संपरीक्षा होईपावेतो किंवा प्रारंभिक अन्वेषण होईपावेतो हवालतीत परत पाठवलेली असेल तर, किंवा.
(c) ग) (क) तिच्या हवालतीची मुदत आदेशाचे अनुपालन होण्यासाठी आणि ज्या कारागृहात तिला बंदिवान किंवा स्थानबध्द केलेले असेल तेथे तिला परत नेण्यासाठी लागणारा अवधी पुरा होण्यापूर्वी संपत असेल तर, किंवा
(d) घ) (ड) कलम ३०३ खाली राज्य शासनाने किंवा केन्द्र शासनाने काढलेला आदेश जिला लागू होतो अशी ती व्यक्ती असेल तर,
कारागृहाचा अमंलदार अधिकारी न्यायालयाचा आदेश अमलात आणण्यापासून परावृत्त राहील आणि याप्रमाणे परावृत्त राहण्यामागील कारणांचे निवेदन न्यायालयाकडे पाठवील:
परंतु कारागृहापासून पंचवीस किलोमीटरहून अधिक दूर नसलेल्या एखाद्या स्थळी साक्ष देण्यासाठी अशा व्यक्तीची समक्ष हजेरी आवश्यक असेल तेथे, कारागृहाचा अंमलदार अधिकारी खंड (b)(ख) (ब) मध्ये उल्लेखिलेल्या कारणास्तव तसा परावृत्त राहणार नाही.