भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २८६ :
संक्षिप्त संपरीक्षेतील अभिलेख :
संक्षिप्त संपरीक्षा केल्या जाणाऱ्या प्रत्येक खटल्यात, राज्य शासन निदेशित करील अशा नमुन्यानुसार दंडाधिकारी पुढील तपशिलाची नोंद करील; तो असा:
(a) क) (अ) खटल्याचा अनुक्रमांक;
(b) ख) (ब) अपराध घडल्याचा दिनांक;
(c) ग) (क) अहवालाचा किंवा फिर्यादीचा दिनांक;
(d) घ) (ड) फिर्याददार असल्यास त्याचे नाव;
(e) ङ) (इ) आरोपीचे नाव, आई वा बापाचे नाव व निवासस्थान;
(f) च) (फ) ज्याबद्दल फिर्याद दिली तो अपराध व शाबीत झालेला (असल्यास ) असा अपराध आणि कलम २८३ मधील पोटकलम (१) च्या खंड (एक) , खंड (दोन ) किंवा खंड (तीन) खाली येणाऱ्या प्रकरणी ज्या मालमत्तेबाबत अपराध करण्यात आला असेल तिचे मूल्य;
(g) छ) (ग) आरोपीचे प्रतिकथन व (झाली असल्यास) त्याची साक्ष तपासणी;
(h) ज) (ह) निष्कर्ष ;
(i) झ) (आय) शिक्षादेश किंवा अन्य अंतिम आदेश ;
(j) ञ) (जे) कार्यवाही समाप्त झाली तो दिनांक.