भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २८२ :
समन्स खटल्याचे वॉरंट खटल्यात रूपांतर करणे :
सहा महिन्यांहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपरादासंबंधीच्या समन्स-खटल्याच्या संपरीक्षेच्या ओघात जेव्हा न्यायहितार्थ अपराधाची संपरीक्षा वॉरंट खटल्याच्या संपरीक्षेच्या प्रकियेनुसार केली पाहिजे असे दंडाधिकाऱ्याला दिसून येईल तेव्हा, असा दंडाधिकारी या संहितेत वॉरंट-खटल्याच्या संपरीक्षेसाठी उपबंधित केलेल्या रीतीने त्या खटल्याची फेरतपासणी करण्यास सुरूवात करू शकेल व पूर्वी साक्षतपासणी केलेल्या अशा कोणत्याही साक्षीदाराला पुन्हा बोलावून घेऊ शकेल.