Bnss कलम २८० : फिर्याद काढून घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २८० :
फिर्याद काढून घेणे :
या प्रकरणाखालील कोणत्याही खटल्यामध्ये अंतिम आदेश दिला जाण्यापूर्वी कोणत्याही वेळी, जर फिर्याददाराने आरोपीविरूध्द किंवा एकापेक्षा अधिक आरोपी असतील तर त्या सर्वांविरूध्द किंवा त्यांच्यापैकी कोणाहीविरूध्द असलेली आपली फिर्याद मागे घेण्याची परवानगी आपणांस मिळण्यासाठी पुरेशी कारणे आहेत अशी दंडाधिकाऱ्याची खात्री पटवली तर, दंडाधिकारी त्याला ती फिर्याद काढून घेण्याची परवानगी देऊ शकेल, आणि ज्या आरोपीबाबतची फिर्याद याप्रमाणे मागे घेण्यात आली असेल त्याला तदनंतर तो दोषमुक्त करील.

Leave a Reply