Bnss कलम २७६ : आरोपीच्या गैरहजेरीत कबुली दोषसिध्दी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २७६ :
आरोपीच्या गैरहजेरीत कबुली दोषसिध्दी :
१) कलम २२९ खाली समन्स काढण्यात आले असेल आणि दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित न होता, दोषारोपाबाबत आपण अपराधी असल्याची कबुली देण्याची आरोपीची इच्छा असेल त्या बाबतीत, त्याला आपली कबुली अंतर्भूत असलेले पत्र व समन्समध्ये विनिर्दिष्ट केलेला द्रव्यदंडदेखील डाकेने किंवा संदेशवाहकाकरवी दंडाधिकाऱ्याकडे पाठवावा लागेल.
२) दंडाधिकारी स्वविवेकानुसार आरोपीला त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या अपराधीपणाच्या कबुलीवरून सिध्ददोष ठरवून, समन्समध्ये विनिर्दिष्ट केलेला द्रव्यदंड भरण्याची शिक्षा देऊ शकेल आणि आरोपीने पाठविलेली रक्कम त्या द्रव्यदंडापोटी वळती करून घेण्यात येईल अथवा आरोपीने या संबंधात प्राधिकृत केलेला वकील आरोपीच्या वतीने कबुली देईल त्या बाबतीत, दंडाधिकारी शक्य असेल तितपत वकिलाने योजलेल्या शब्दातच ती कबुली नमूद करून ठेवील आणि स्वविवेकानुसार अशा कबुलीवरून आरोपीला सिध्ददोष ठरवून वर सांगितल्याप्रमाणे त्याला शिक्षा देऊ शकेल.

Leave a Reply