भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २७२ :
फिर्यादीची अनुपस्थिती :
फिर्यादीवरून कार्यवाही दाखल केलेली असून खटल्याच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या कोणत्याही दिवशी फिर्याददार अनुपस्थित असेल, आणि अपराध कायद्याने आपसात मिटवता येत असेल किंवा तो दखलपात्र अपराध नसेल तेव्हा, यात यापूर्वी काहीही अंतर्भूत असले तरी, दोषारोपाची मांडणी केली जाण्यापूर्वी कोणत्याही वेळी दंडाधिकारी, फिर्यादीदारास उपस्थित राहण्यास तीस दिवसांचा कालावधी दिल्यानंतर, स्वविवेकानुसार आरोपीस विनादोषारोप सोडू शकेल.