भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २६८ :
आरोपीला केव्हा विनादोषारोप सोडले जाईल ? :
१) कलम २६७ मध्ये निर्दिष्ट केलेला सर्व साक्षीपुराव घेतल्यावर ज्याचे खंडन न झाल्यास आरोपीला सिध्ददोष ठरवणे समर्थनीय होईल असे कोणतेही तथ्य त्याच्याविरूध्द शाबीत करण्यात आलेले नाही असे काही कारणांस्तव दंडाधिकाऱ्यास वाटले तर, दंडाधिकारी ती कारणे नमूद करून त्याला विनादोषारोप सोडील.
२) खटला कोणत्याही पूर्वीच्या टप्प्यात असताना जर काही कारणांस्तव दंडाधिकाऱ्यास आरोप निराधार आहे असे वाटले तर, ती कारणे नमूद करून आरोपीस विनादोषारोप सोडण्यास अशा दंडाधिकाऱ्याला या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होतो असे मानले जाणार नाही.