भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
(B) ख) (ब) – पोलीस अहवालाविना अन्यप्रकारे खटले दाखल करणे :
कलम २६७ :
फिर्यादी पक्षातर्फे साक्षी-पुरावा :
१) पोलीस अहवालाव्यतिरिक्त अन्यथा दाखल केलेल्या कोणत्याही वॉरंट-खटल्यामध्ये जेव्हा आरोपी दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित होईल किंवा आणला जाईल, तेव्हा दंडाधिकारी फिर्यादी पक्षाचे म्हणणे ऐकण्यास सुरूवात करील आणि फिर्यादी पक्षाच्या पुष्टयर्थ सादर करण्यात येईल असा सर्व साक्षीपुरावा घेईल.
२) दंडाधिकारी फिर्यादी पक्षाच्या अर्जावरून त्याच्या साक्षीदारांपैकी कोणासही समक्ष हजर होण्याचा अथवा कोणताही कागद किंवा अन्य वस्तू हजर करण्याचा त्याला निदेश देणारे समन्स काढू शकेल.