भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २० :
दंडाधिकाऱ्याने करावयाची वॉरंट खटल्यांची संपरीक्षा :
(A) क) (अ) – पोलीस अहवालावरुन खटले दाखल करणे :
कलम २६१ :
कलम २३० चे अनुपालन :
पोलीस अहवालावरून गुदरलेल्या कोणत्याही वॉरंट-खटल्यात जेव्हा संपरीक्षेच्या प्रारंभी आरोपी दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित होईल किंवा आणला जाईल तेव्हा, आपण कलम २३० च्या उपबंधांचे अनुपालन केले आहे अशी न्याय दंडाधिकारी स्वत:ची खात्री करून घेईल.