Bnss कलम २५७ : युक्तिवाद :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५७ :
युक्तिवाद :
जेव्हा बचावपक्षाच्या बाजूने कोणी साक्षीदार असल्यास त्यांची साक्षतपासणी पूर्ण होईल तेव्हा फिर्यादी आपली बाजू संक्षेपाने मांडील आणि आरोपी किंवा त्याचा वकील उत्तर देण्यास हक्कदार होईल:
परंतु, जेव्हा आरोपीने किंवा त्याच्या वकिलाने कायदेविषयक मुद्दा उपस्थित केला असेल तेव्हा न्यायाधीशाच्या परवानगीने फिर्यादीपक्षाला अशा कायदेविषयक मुद्दयासंबंधात आपली निवेदने सादर करता येतील.

Leave a Reply