भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५५ :
दोषमुक्ति :
फिर्यादीपक्षार्ते साक्षीपुरावा घेऊन आरोपीची साक्षतपासणी केल्यानंतर आणि त्या मुद्दयावरील फिर्यादीपक्षाचे व बचावपक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर जर, न्यायाधीशाला आरोपीने अपराध केला असल्याचा पुरावा नाही असे वाटले तर, न्यायाधीश दोषमुक्तीचा आदेश नमूद करील.