Bnss कलम २५१ : दोषारोपाची मांडणी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५१ :
दोषारोपाची मांडणी करणे :
१) पुर्वोक्तानुसार विचार केल्यानंतर आणि पक्षांची बाजू ऐकल्यानंतर जर,-
(a) क) (अ) आरोपीने केलेला अपराध केवळ सत्र न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा असा नाही असे गृहीत धरण्यात आधार आहे असे न्यायाधीशाचे मत झाले तर, तो आरोपी व्यक्तीविरूध्द दोषारोप ठेवू शकेल आणि आदेशाद्वारे तो खटला संपरीक्षेसाठी मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याकडे किंवा इतर कोणत्याही प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्याकडे वर्ग करू शकेल आणि त्या आरोपीला मुख्य न्याय दंडादिकाऱ्याकडे किंवा प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्याकडे त्याला (न्यायाधीशाला) योग्य वाटेल अशा तारखेला उपस्थित राहण्याचे निदेश देऊ शकेल आणि तदनंतर पोलीस अहवालावरून सुरू केलेल्या वॉरंट-खटल्यांच्या संपरीक्षेसाठी अनुसरावयाच्या प्रक्रियेनुसार असा दंडाधिकारी त्या अपराधाची संपरीक्षा करील;
(b) ख) (ब) आरोपीने केलेला अपराध केवळ सत्र न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा असा आहे असे गृहीत धरण्यास आधार आहे असे न्यायाधीशाचे मत झाले तर, तो आरोपावरील पहिल्या सुनावणीच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत आरोपीविरूध्द दोषारोपाची लेखी मांडणी करील.
२) पोटकलम (१) च्या खंड (ख) (ब) (b)खाली न्यायाधीश दोषारोपांची मांडणी करील त्या बाबतीत, तो दोषारोप आरोपीला एक तर शारीरिक किंवा श्रव्य-दृश्य इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे वाचून दाखवला जाईल व समजावून देण्यात येईल आणि आरोपीवर दोषारोप केलेला अपराध तो कबूल करणार आहे की आपली संपरीक्षा केली जाण्याची मागणी करणार आहे हे त्याला विचारले जाईल.

Leave a Reply