Bnss कलम २४४ : कोणता अपराध केलेला आहे याबद्दल शंका असेल तेथे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २४४ :
कोणता अपराध केलेला आहे याबद्दल शंका असेल तेथे :
१) जी तथ्ये शाबीत करता येतील ती अनेक अपराधांपैकी कोणत्या अपराधाची घटकतथ्ये होतील हे शंकास्पद आहे असे एखाद्या कृतीचे किंवा कृतिमालिकेचे स्वरूप असेल तर, आरोपीने असे सर्व किंवा त्यापैकी कोणतेही अपराध केल्याचा दोषारोप त्याच्यावर ठेवता येईल, आणि अशांपैकी कितीही दोषारोपांची एकाच वेळी संपरीक्षा करता येईल;अथवा उक्त अपराधांपैकी कोणता ना कोणता तरी अपराध केल्याचे पर्यायी दोषारोप त्याच्यावर ठेवता येतील.
२) जर अशा प्रकरणात आरोपीवर एका अपराधाचा दोषारोप ठेवला असेल आणि पोटकलम (१) च्या उपबंधाखाली ज्या अपराधाचा त्याच्यावर दोषारोप ठेवता आला असता असा एखादा वेगळा अपराध त्याने केला असल्याचे पुराव्यात दिसून आले तर, त्याने जो अपराध केला असल्याचे दाखवण्यात आले असेल त्या अपराधाचा त्याच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेला नसला तरी त्याच्याबद्दल त्याला सिध्ददोष ठरवता येईल.
उदाहरणे :
(a) क) चारी किंवा चारीची संपत्ती स्वीकारणे किंवा फौजदारीपात्र न्यासभंग किंवा ठकवणूक या सदरात मोडू शकेल अशा कृतीचा (क) वर आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर चारी करणे, चोरीची संपत्ती स्वीकारणे, फौजदारीपात्र न्यासभंग करणे व ठकवणूक करणे हे दोषारोप ठेवता येतील अथवा त्याच्यावर चारी केल्याचा किंवा चारीची संपत्ती स्वीकारल्याचा किंवा फौजदारीपात्र न्यासभंग केल्याचा किंवा ठकवणूक केल्याचा दोषारोप ठेवता येईल.
(b) ख) वर उल्लेखिलेल्या प्रकरणात (क) वर फक्त चोरीचा दोषारोप ठेवण्यात आला आहे. त्याने फौजदारीपात्र न्यासभंग केल्याचा किंवा चोरीचा माल स्वीकारल्याचा अपराध केला आहे असे दिसून येते. अशा अपराधाचा त्याच्यावर दोषारोप ठेवलेला नसला तरी, त्याला फौजदारीपात्र न्यासभंगाबद्दल किंवा, (प्रकरणपरत्वे), चोरीचचा माल स्वीकारल्याबद्दल सिद्ददोष ठरवता येईल.
(c) ग) (ख) ने (ग) ला दंडुक्याने मारल्याचे आपण पाहिले असे (क) दंडाधिकाऱ्यासमोर शपथेवर कथन करतो. (ख) ने (ग) ला कधीच मारले नव्हते असे (क) सत्र न्यायालयापुढे शपथेवर कथन करतो. या परस्परविरोधी विधानांपैकी कोणते खोटे आहे हे शाबीत करणे शक्य नसले तरीही, (क) वर त्यांपैकी कशाचाही दोषारोप ठेवून त्याने उद्देशपूर्वक खोटी साक्ष दिल्याबद्दल त्याला सिद्धदोष ठरवता येईल.

Leave a Reply