Bnss कलम २३ : दंडाधिकारी कोणत्या शिक्षा देऊ शकतात :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २३ :
दंडाधिकारी कोणत्या शिक्षा देऊ शकतात :
१) मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याचे न्यायालय मृत्यूची किंवा आजीव कारावासाची किंवा सात वर्षांहून अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षा खेरीजकरून, कायद्याव्दारे प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देऊ शकेल.
२) प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याचे न्यायालय जास्तीत जास्त तीन वर्षे इतक्या मुदतीच्या कारावासाची, किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रूपये इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा किंवा सामुदायिक सेवेची शिक्षा देऊ शकेल.
३) व्दितीय वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याचे न्यायालय जास्तीत जास्त एक वर्ष इतक्या मुदतीच्या कारावासाची, किंवा जास्तीत जास्त दहा हजार रूपये इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा किंवा सामुदायिक सेवेची शिक्षा देऊ शकेल.

Leave a Reply