Bnss कलम २३५ : वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २३५ :
वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील :
१) अभिकथित अपराधाची वेळ, स्थळ आणि ज्या व्यक्तीविरूध्द (असल्यास) किंवा ज्या वस्तूबाबत (असल्यास) तो अपराध करण्यात आला ती व्यक्ती किंवा वस्तू यासंबंधी दोषारोपात, आरोपीवर ज्या गोष्टीचा दोषारोप ठेवण्यात आला आहे तिची त्याला जाणीव देण्यास वाजवीपणे पुरेसा होईल असा तपशील अंतर्भूत असेल.
२) जेव्हा आरोपीवर फौजदारीपात्र न्यासभंग अथवा पैशाचा किंवा अन्य जंगम मालमत्तेचा अप्रामाणिकपणे केलेला अपहार यांचा दोषारोप ठेवण्यात येईल तेव्हा, ज्या रकमेबाबत किंवा अन्य जंगम मालमत्तेबाबत अपराध केल्याचे अभिकथन करण्यात आले असेल तिच्यातील विशिष्ट बाबी विनिर्दिष्ट न करता, ती ठोक रक्कम विनिर्दिष्ट केल्यास किंवा त्या जंगम मालमत्तेचे वर्णन दिल्यास आणि नेमके दिनांक विनिर्दिष्ट न करता, ज्या दिनांकांच्या दरम्यान अपराध घडला असे अभिकथन करण्यात आले असेल ते नमूद केल्यास तेवढे पुरेसे होईल आणि याप्रमाणे मांडणी करण्यात आलेला दोषारोप हा कलम २४२ च्या अर्थानुसार एका अपराधाचा दोषारोप असल्याचे मानण्यात येईल :
परंतु, अशा दिनांकापैकी पहिल्या आणि शेवटच्या दिनांकामध्ये समाविष्ट असलेला अवधी एक वर्षाहून अधिक असणार नाही.

Leave a Reply