भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २२ :
उच्च न्यायालय व सत्र न्यायाधीश कोणत्या शिक्षा देऊ शकतात :
१) उच्च न्यायालय कायद्याव्दारे प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देऊ शकेल.
२) सत्र न्यायाधीश किंवा अपर सत्र न्यायाधीश कायद्याव्दारे प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देऊ शकेल; पण अशा कोणत्याही न्यायाधीशाने दिलेला कोणताही मृत्यूचा शिक्षादेश हा उच्च न्यायालयाने तो कायम करण्याच्या शर्तीस अधीन असेल.