भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २२० :
भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ८५ खालील अपराधाची दखल घेणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ८५ खालील अपराधास घटकभूत असलेल्या तथ्यांबाबत पोलीस अहवाल मिळाल्याशिवाय अथवा तया अपराधामुळे उपसर्ग पोचलेल्या व्यक्तीने अगर तिचा बाप, आई, भाऊ, बहिण यांनी अगर तिच्या बापाचा किंवा आईचा भाऊ किंवा बहीण यांनी अगर न्यायालयाची परवानगी घेऊन, तिच्याशी रक्ताच्या, सोयरिकीच्या किंवा दत्तकाच्या नात्याने संबंधित असलेल्या व्यक्तीने फिर्याद दिलेली असल्याशिवाय, कोणतेही न्यायालय अशा अपराधाची दखल घेणार नाही.