Bnss कलम २१५ : लोकसेवकांच्या अवमानाबद्दल – सार्वजनिक न्यायाविरूद्ध अपराध – पुराव्यात दस्तऐवज दाखल खटला :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २१५ :
लोकसेवकांच्या अवमानाबद्दल – सार्वजनिक न्यायाविरूद्ध अपराध – पुराव्यात दस्तऐवज दाखल खटला :
१) कोणतेही न्यायालय –
(a) क) (अ) एक) भारतीय न्याय संहिता २०२३ यांच्या कलम २०६ ते कलम २२३ (कलम २०९ शिवाय दोन्ही धरून) या कलमाखाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाबाबत, किंवा
दोन) अशा अपराधास कोणतीही अपप्रेरणा देण्यात आल्याबाबत किंवा तो करण्याच्या प्रयत्नाबाबत, किंवा
तीन) असा अपराध करण्यासाठी केलेल्या कोणत्याही फौजदारीपात्र कटाबाबत,
संबंधित लोक सेवकाकडून किंवा ज्याला तो प्रशासकीय दुष्ट्या दुय्यम असेल किंवा संबंधित लोकसेवकाने तसे करण्यास प्राधिकृत केलेला कोणताही अन्य लोकसेवक अशा अन्य एखाद्या लोक सेवकाकडून लेखी फिर्याद आल्याशिवाय;
(b) ख) (ब) एक) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या पुढीलपैकी म्हणजे कलम २२९ ते कलम २३३ (दोन्ही धरून) कलम २३६, कलम २३७, कलम २४२ ते कलम २४८ (दोन्ही धरून) आणि कलम २६७ यांपैकी कोणत्याही कलमाखाली शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध कोणत्याही न्यायालयातील कोणत्याही कार्यवाहीत किंवा तिच्या संबंधात केला असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल तेव्हा, अशा अपराधाबाबत, किंवा
दोन) उक्त संहितेच्या कलम ३३६ च्या पोटकलम (१) मध्ये वर्णिलेला, किंवा कलम ३४० च्या पोटकलम (२) किंवा कलम ३४२ खाली शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध कोणत्याही न्यायालयातील कार्यवाहीत हजर केलेल्या किंवा पुराव्यात दिलेल्या दस्तऐवजाबाबत केला असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल तेव्हा, अशा अपराधाबाबत, किंवा
तीन) उपखंड (एक) किंवा उपखंड (दोन) मध्ये विनिर्दिष्ट केलला कोणताही अपराध करण्याच्या कोणत्याही फौजदारीपात्र कटाबाबत किंवा तो करण्याचया प्रयत्नाबाबत किंवा त्यास अपप्रेरणा देण्यात आल्याबाबत,
त्या न्यायालयाकडून ते न्यायालय या बाबतीत लेखी प्राधिकृत करील अशा, त्या न्यायालयाच्या अधिकाऱ्याकडून किंवा ज्याला ते न्यायालय दुय्यम असेल अशा अन्य एखाद्या न्यायालयाकडून लेखी फिर्याद आल्याशिवाय,
त्याची दखल घेणार नाही.
२) जेव्हा पोटकलम (१) च्या खंड (a)(क) (अ) खाली एखाद्या लोकसेवकाने किंवा तसे करण्यास प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही लोकसेवकाने फिर्याद दिली असेल तेव्हा, प्रशासकीय दृष्ट्या तो ज्यास दुय्यम असेल असे कोणतेही प्राधिकरण किंवा ज्याने अशा लोकसेवकाला प्राधिकृत केले असेल, फिर्याद काढून घेण्याचा आदेश देऊन अशा आदेशाची प्रत न्यायालयाकडे पाठवू शकेल; आणि न्यायालयाला ती मिळाल्यावर, त्या फिर्यादीवरून पुढील कोणतीही कार्यवाही केली जाणर नाही;
परंतु प्रारंभिक न्यायालयातील संपरीक्षा समाप्त झाली असेल तर, फिर्याद काढून घेण्याचा असा कोणताही आदेश दिला जाणार नाही.
३) पोटकलम (१) च्या खंड (b)(ख) (ब) मध्ये न्यायालय या संज्ञेचा अर्थ, दिवाणी, महसूल किंवा फौजदारी न्यायालय असा आहे, आणि त्या संज्ञेत, एखाद्या केंद्रीय, प्रांतीय किंवा राज्य अधिनियमाद्वारे किंवा त्याखाली घटित झालेले एखादे अधिकरण या कलमाच्या प्रयोजनार्थ न्यायालय असल्याचे त्या अधिनियामद्वारे घोषित करण्यात आले असेल तर, त्या अधिकरणाचा समावेश होतो.
४) पोटकलम (१) खंड (b)(ख) (ब) च्या प्रयोजनार्थ, एखाद्या न्यायालयाच्या अपीलयोग्य हुकूमनाम्यांवर किंवा न्यायनिर्णयांवर सर्वसामान्यापणे ज्या न्यायालयाकडे अपिल होऊ शकतात, त्या न्यायालयाला असे पूवोक्त न्यायालय दुय्यम असल्याचे किंवा ज्या दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यांवर सर्वसामान्यापणे अपील होऊ शकत नाही त्याच्या बाबतीत, ते साधारण मूळ दिवाणी अधिकारिता असलेल्या ज्या मुख्य न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेत असेल त्यास असे दिवाणी न्यायालय दुय्यम असल्याचे मानले जाईल:
परंतु,-
(a) क) (अ) एकाहून अधिक न्यायालयांकडे अपिले होऊ शकतात त्या बाबतीत, कनिष्ठ अधिकारितेच्या अपील न्यायालयास ते न्यायालय दुय्यम असल्याचे मानले जाईल;
(b) ख) (ब) एखाद्या दिवाणी आणि महसूल न्यायालयाकहेही अपिले होऊ शकतात त्या बाबतीत, ज्याच्या संबंधात अपराध केल्याचे अभिकथन करण्यात आले असेल त्या प्रकरणाच्या किंवा कार्यवाहीच्या स्वरूपानुसार, दिवाणी किंवा महसूल न्यायालयाला अने न्यायालय दुय्यम असल्याचे मानले जाईल.

Leave a Reply