भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २०८ :
भारताबाहेर करण्यात आलेला अपराध :
जेव्हा –
(a) क) (अ) भारताच्या नागरिकाने मुक्त सागरात किंवा अन्यत्र, किंवा
(b) ख) (ब) असा नागरिक नसलेल्या इसमाने भारतात नोंदणी झालेल्या कोणत्याही जहाजावर किंवा विमानावर,
भारताबाहेर अपराध केलेला असेल तेव्हा, भारतात ज्या कोणत्याही स्थळी तो सापडेल तेथेच जणू काही असा अपराध करण्यात आलेला असावा त्याप्रमाणे त्याबाबत त्याच्याविरूद्ध कार्यवाही करता येईल:
परंतु, या प्रकरणातील कोणत्याही पूर्ववर्ती कलमात काहीही असले तरी, भारतात अशा कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा केंद्र शासनाच्या पूर्वमंजुरीशिवाय केली जाणार नाही.