Bnss कलम २०४ : एकत्रितपणे संपरीक्षा योग्य अपराधांची चौकशीचे स्थान :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २०४ :
एकत्रितपणे संपरीक्षा योग्य अपराधांची चौकशीचे स्थान :
जेव्हा
(a) क) (अ) कोणत्याही व्यक्तीने केलेले अपराध असे असतील की, अशा प्रत्येक अपराधाबद्दल तिच्यावर कलम २४२, कलम २४३ किंवा कलम २४४ च्या उपबंधांच्या आधारे दोषारोप ठेवता येईल व एका संपरीक्षेत तिची संपरीक्षा करता येईल; किंवा
(b) ख) (ब) अनेक व्यक्तींनी केलेला किंवा केलेले अपराध असे असतील की, कलम २४६ च्या उपबंधांच्या आधारे त्यांच्यावर एकत्रितपणे दोषारोप ठेवता येईल व संपरीक्षा करता येईल.
तेव्हा त्या अपराधांची चौकशी किंवा संपरीक्षा त्यांपैकी कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा करण्यास सक्षम असलेल्या कोणत्याही न्यायालयाला करता येईल.

Leave a Reply