Bnss कलम २०२ : इलैक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे, पत्रे इत्यादीद्वारे केलेले अपराध :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २०२ :
इलैक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे, पत्रे इत्यादीद्वारे केलेले अपराध :
१) ज्यात ठकवणुकीचा समावेश आहे अशा कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा, जर इलैक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे, पत्रांद्वारे किंवा संदेशाद्वारे फसवणुक केली गेली असेल तर, ज्याच्या स्थानिक अधिकारितेत अशी इलैक्ट्रॉनिक माध्यमे, पत्रे किंवा संदेश पाठवण्यात आले किंवा मिळाले त्या न्यायालयाला करता येईल; व ठकवणुकीच्या किंवा मालमत्ता सुपूर्द करण्यास अप्रामाणिकपणे प्रवृत्त करण्याच्या कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा, ज्याच्या स्थानिक अधिकारितेत फसवणूक झालेल्या व्यक्तीने मालमत्ता देऊन टाकली किंवा आरोपी व्यक्तीने स्वीकारली त्या न्यायालयाला करता येईल.
२) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ८२ खाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा ज्याच्या स्थानिक अधिकारितेत अपराध घडला किंवा अपराधी व्यक्ती पहिल्या विवाहातील आपल्या विवाहसाथीसह निकटपूर्वी राहात होती किंवा पहिल्या विवाहातील पत्नीने अपराध घडल्यानंतर कायमचे वास्तव्य करण्यास प्रारंभ केला असेल त्या न्यायालयाला करता येईल.

Leave a Reply