भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २०० :
कृतीचा अन्य अपराधाशी संबंध म्हणून अपराध तर चौकशी स्थळ :
जेव्हा एखादी कृती अशा अन्य एखाद्या कृतीशी तिचा संबंध असल्याने अपराध ठरत असेल की जी कृती स्वयमेव अपराध आहे किंवा तिचा कर्ता अपराध करण्यास क्षम असता तर अपराध ठरू शकली असती असे असेल तेव्हा, प्रथम उल्लेखिलेल्या अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा ज्याच्या स्थानिक अधिकारितेत त्यांपैकी कोणतीही कृती करण्यात आली त्या न्यायालयाला करता येईल.