भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १९९ :
जेथे कृत्य करण्यात आले अगर परिणाम झाला त्या ठिकाणी चौकशी :
विवक्षित कृत्य करण्यात आले व त्यामुळे विवक्षित परिणाम घडऊन आला या कारणास्तव ते कृत्य अपराध ठरत असेल तेव्हा, त्याची चौकशी किंवा संपरीक्षा ज्याच्या स्थानिक अधिकारितेत असे कृत्य करण्यात आले असेल किंवा असा परिणाम घडऊन आला असेल त्या न्यायालयाला करता येईल.