भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १७२ :
व्यक्तींनी पोलिसांच्या वाजवी निर्देशांचे पालन करण्यास बांधील असणे :
१) सर्व व्यक्ती, या प्रकरणाअन्वये त्यांचे कोणतेही कर्तव्य पार पाडताना, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या वाजवी निर्देशां अनुरुप बांधील असतील.
२) पोटकलम (१) अन्वये त्याला विरोध, नकार, अवज्ञा किंवा निर्देशांची अवहेलना केल्याबद्दल कोणताही पोलीस अधिकारी कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेऊ शकतो किंवा काढून टाकू शकतो आणि अशा व्यक्तीला दंडाधिकाऱ्यासमोर घेऊन जाऊ शकतो किंवा लहान प्रकरणांमध्ये, त्याला चोवीस तासांच्या कालावधीत शक्य तितक्या लवकर मुक्त करु शकेल.