भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १७१ :
सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोचविण्यास प्रतिबंध-हरकत करणे :
आपल्या मते कोणत्याही जंगम किंवा स्थावर सार्वजनिक मालमत्तेला जी कोणतीही क्षती पोचविण्याचा प्रयत्न होत असेल तिला अथवा कोणतेही सार्वजनिक भूचिन्ह, नौकानयनासाठी वापरला जाणारा बोया किंवा अन्य चिन्ह हलवण्यास किंवा त्याला क्षती पोचविण्यास प्रतिबंध करण्यासाठी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला स्वत:च्या अखत्यारात हस्तक्षेप करता येईल.