भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १७० :
दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अटक :
१) कोणताही दखलपात्र अपराध करण्याचा बेत माहीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जर अपराध केला जाण्यास अन्यथा प्रतिबंध करता येणे शक्य नाही असे दिसून आले तर असा अधिकारी याप्रमाणे बेत रचणाऱ्या व्यक्तीला दंडाधिाकऱ्याच्या आदेशांशिवाय आणि वॉरटाशिवाय अटक करू शकेल.
२) पोटकलम (१)खाली अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला, तिच्या अटकेच्या वेळेपासून चोवीस तासांपेक्षा अधिक काळपर्यंत हवालतीत स्थानबध्द केले जाणार नाही – मात्र या संहितेच्या अन्य कोणत्याही उपबंधांखाली किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखाली त्या व्यक्तीला आणखी काही काळ स्थानबध्द करून ठेवणे आवश्यक असेल किंवा प्राधिकृत असेल तर तो अपवाद समजावा.