भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १६९ :
दखलपात्र अपराध करण्याची तयारी ची खबर देणे :
कोणताही दखलपात्र अपाराध करण्यासाठी रचलेल्या बेताची खबर ज्याला मिळेल असा प्रत्येक पोलीस अधिकारी, ज्या पोलीस अधिकाऱ्याला तो दुय्यम असेल त्याला आणि असा कोणताही अपराध केला जाण्यास प्रतिबंध करणे किंवा त्याची दखल घेणे हे ज्याचे कर्तव्य आहे अशा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याला अशी खबर कळवील.