Bnss कलम १६१ : चौकशी होईपावेतो मनाई आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १६१ :
चौकशी होईपावेतो मनाई आदेश :
१) कलम १५२ खाली आदेश काढणाऱ्या दंडाधिाकऱ्याला जर,लोकांना पोचू शकणारे निकटवर्ती संकट किंवा गंभीर स्वरूपाची क्षती टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना केली पाहिजे असे वाटेल तर, ज्या व्यक्तीविरूध्द आदेश काढण्यात आला तिला, त्या बाबीचा निर्णय होईतोवर, असे संकट किंवा क्षती निवारण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आवश्यक असेल असा व्यदेश दंडाधिकारी काढू शकेल.
२) अशा व्यक्तीने अशा व्यादेशाचे तत्काळ पालन करण्यात कसूर केल्यास, दंडाधिकाऱ्याला असे संकट निवारण्यासाठी किंवा अशी क्षती टाळण्यासाठी स्वत:ला योग्य वाटेल अशा मार्गाचा अवलंब करता येईल किंवा करवता येईल.
३) या कलमाखाली सभ्दावपूर्वक करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत दावा लावता येणार नाही.

Leave a Reply