Bnss कलम १६० : आदेश कायम केल्यानंतरची प्रक्रिया आणि अवज्ञा केल्यास परिणाम :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १६० :
आदेश कायम केल्यानंतरची प्रक्रिया आणि अवज्ञा केल्यास परिणाम :
१) जेव्हा कलम १५५ किंवा कलम १५७ खाली आदेश करण्यात आलेला असेल तेव्हा, दंडाधिकारी ज्या व्यक्तीविरूध्द आदेश काढण्यात आला तिला त्याची नोटीस देईल, आणि तसेच आदेशाव्दारे निदेशित केलेली कृती नोटिशीत निश्चित केलेल्या अवधीत करण्यास तिला फर्मावील आणि अवज्ञा झाल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलम २२३ व्दारे उपबंधित केलेल्या शिक्षेस ती पात्र होईल असे तिला कळवील.
२) जर अशी कृती निश्चित केलेल्या अवधीत करण्यात आली नाही, तर, दंडाधिकाऱ्याला ती करवून घेता येईल आणि ती करण्याचा खर्च, त्याच्या आदेशानुसार हलवण्यात आलेल्या कोणत्या इमारतीच्या, मालाच्या किंवा अन्य मालमत्तेच्या विक्रीव्दारे, अथवा अशा दंडाधिकाऱ्याच्या स्थानिक अधिकारितेच्या आत किंवा बाहेर अशा व्यक्तीची अन्य कोणतीही जंगम मालमत्ता असल्यास तिला अटकावणी लावून व ती विकून वसूल करता येईल, आणि जर अशी अन्य मालमत्ता अशा अधिकारितेबाहेर असेल तर, जप्त करावयाची मालमत्ता ज्याच्या स्थानिक अधिकारितेत असल्याचे आढळून येईल त्या दंडाधिकाधिकाऱ्याने तो आदेश पृष्ठांकित केल्यावर ती मालमत्ता जप्त करून विकणे हे त्याव्दारे प्राधिकृत होईल.
३) या कलमाखाली सभ्दावपूर्वक करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत कोणताही दावा लावता येणार नाही.

Leave a Reply