भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १५९ :
लेखी सूचना इ. देण्याचा दंडाधिकाऱ्याचा अधिकार :
१) जेव्हा कलम १५८ खाली एखाद्या व्यक्तीने स्थानिक अन्वेषण करावे असे दंडाधिकारी निदेशित करील तेव्हा, दंडाधिकारी,:
(a) क) (अ) अशा व्यक्तीला तिच्या मार्गदर्शनासाठी जरूरीचे वाटतील असे लेखी अनुदेश देऊ शकेल;
(b) ख) (ब) स्थानिक अन्वेषणाचा जरूर तो संपूर्ण खर्च किंवा त्याचा कोणताही भाग कोणी द्याया ते घोषित करू शकेल.
२) अशा व्यक्तीचा अहवाल हा या प्रकरणात पुरावा म्हणून वाचता येईल.
३) दंडाधिकारी कलम १५८ खाली समन्स पाठवून तज्ज्ञाची साक्षतपासणी करील त्या बाबतीत, दंडाधिकारी असा समन्स पाठवण्याचा आणि साक्षतपासणीचा खर्च कोणी द्यावा ते निदेशित करू शकेल.