Bnss कलम १५७ : कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यात आला असेल, तेथे कारण दाखविण्यासाठी प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १५७ :
कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यात आला असेल, तेथे कारण दाखविण्यासाठी प्रक्रिया :
१) कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरूध्द आदेश देण्यात आला असेल तिने उपस्थित होऊन आदेशाविरूध्द कारण दाखवले तर, दंडाधिकारी समन्स-खटल्यात घेतला जातो त्याप्रमाणे या बाबतीत साक्षीपुरावा घेईल.
२) तो आदेश मुळात जसा केला होता तसा किंवा आपणांस जरूर वाटले असा त्यात बदल केल्यास, तो वाजवी व योग्य होईल याबाबत जर दंडाधिकाऱ्याचे समाधान झाले तर, तो आदेश बदलाशिवाय किंवा, प्रकरणपरत्वे, अशा बदलासह कायम केला जाईल.
३) जर दंडाधिकाऱ्याचे याप्रमाणे समाधान झाले नाही तर, त्या प्रकरणात पुढील कार्यवाही केली जाणार नाही :
परंतु, या कलमाखालील प्रक्रिया नव्वद दिवसांच्या कालावधीत शक्य तितक्या लवकर पूर्ण केल्या जातील जी लेखी नोंद करण्याच्या कारणांसाठी एकशे वीस दिवसांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

Leave a Reply