भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १५४ :
आदेशाचे पालन करणे अगर कारण दाखविणे :
ज्या व्यक्तीविरूध्द असा आदेश काढण्यात आला असेल त्या व्यक्तीला –
(a) क) (अ) आदेशाव्दारे निदेशित केलेली कृती त्यात विनिर्दिष्ट केलेल्या अवधीत व त्या रीतीने करावी लागेल; किंवा
(b) ख) (ब) अशा आदेशाला अनुसरून उपस्थित व्हावे लागेल व त्या आदेशाविरूध्द कारण दाखवावे लागेल आणि अशी हजेरी किंवा आभासी सुनावणीला दृक-श्राव्य (ऑडियो-व्हिडियो) परिसंवादाद्वारे परवानगी दिली जाऊ शकते.