Bnss कलम १५१ : कलम १४८, १४९ आणि १५० या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला भरला जाण्यांपासून संरक्षण :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १५१ :
कलम १४८, १४९ आणि १५० या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला भरला जाण्यांपासून संरक्षण :
१) कलम १४८, कलम १४९, किंवा कलम १५० खाली केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही व्यक्तीविरूध्द,-
(a) क) (अ) जेथे अशी व्यक्ती ही सशस्त्र सेनादलातील अधिकारी किंवा सदस्य असेल तेथे, केंद्र शासनाच्या मंजुरीखेरीज;
(b) ख) (ब) अन्य कोणत्याही प्रकरणी राज्य शासनाच्या मंजुरीखेरीज कोणत्याही फौजदारी न्यायालयात कोणताही खटला भरला जाणार नाही.
२) (a) क) (अ) कोणताही कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी, उक्त कलमांपैकी कोणत्याही कलमाखाली सभ्दावपूर्वक कार्य करत असाताना त्याने;
(b) ख) (ब) कोणतीही व्यक्ती कलम १४८ किंवा कलम १४९ खालील फर्मानाच्या अनुपालनार्थ सभ्दावपूर्वक कोणताही कृती करत असाताना त्या व्यक्तीने;
(c) ग) (क) सशस्त्र सेनादलाचा कोणताही अधिकारी कलम १५१ खाली सभ्दावपूर्वक कार्य करत असाताना त्याने;
(d) घ) (ड) सशस्त्र सेनादलाचा कोणताही सदस्य, तो ज्या आदेशाचे पालन करण्यास बांधलेला असेल त्याच्या पालनार्थ कोणताही कृती करत असताना त्याने,
त्यामुळे अपराध केला असल्याचे मानले जाणार नाही :
परंतु, कलम १७४ च्या पोटकलम (१) अन्वये कोणताही खटला सशस्त्र दलाच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर किंवा सदस्याविरुद्ध कोणताही आदेश पार पाडण्यासाठी किंवा त्याने केलेल्या कोणत्याही कृतीसाठी जे तो त्याच्या अधिकृत कर्तव्याच्या पार पाडण्यासाठी बांधील होता, या प्रकरणात प्राथमिक चौकशी केल्याशिवाय नोंदणी केली जाणार नाही :
परंतु आणखी असे की, संघाच्या सशस्त्र दलाचा कोणताही अधिकारी किंवा सदस्य किंवा राज्याचा कोणताही पोलीस अधिकारी आदेशाचे पालन करण्यासाठी त्याच्या अधिकृत कर्तव्याच्या पूर्ततेत ज्या साठी तो बांधील होता, त्याने केलेल्या किंवा केल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी, यथास्थिति, केन्द्र सरकार किंवा राज्य सरकारच्या संमती प्राप्त केल्याशिवाय, अटक केले जाणार नाही.
३) या कलमात आणि या प्रकरणातील पूर्ववर्ती कलमांमध्ये,-
(a) क) (अ) सशस्त्र सेनादले या शब्दप्रयोगाचा अर्थ स्थलसेना म्हणून कार्य करणारी भूसैनिकी; नौसैनिकी, वायुसैनिकी दले असा आहे आणि याप्रमाणे कार्य करणारी संघराज्याची अन्य कोणतीही दले त्या संज्ञेत समाविष्ट आहेत;
(b) ख) (ब) अधिकारी याचा सशस्त्र सेनादलाच्या संबंधातील अर्थ, सशस्त्र सेनादलाचा अधिकारी म्हणून राजादिष्ट किंवा राजपत्रित झालेली किंवा त्या नात्याने नोकरीत असलेली व्यक्ती असा आहे आणि कनिष्ठ राजादिष्ट अधिकारी, अधिपत्र अधिकारी, पेटी ऑफिसर, अराजादिष्ट अधिकारी व अराजपत्रित अधिकारी यांचा त्या संज्ञेत समावेश आहे;
(c) ग) (क) सदस्य याचा सशस्त्र सेनादलांच्या संबंधातील अर्थ, सशस्त्र सेनादलांत असलेली अधिकाऱ्याहून अन्य व्यक्ती असा आहे.

Leave a Reply