भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १५० :
लष्कराला आपण होऊन जमाव पांगविण्याचा अधिकार :
जेव्हा अशा कोणत्याही जमावामुळे सार्वजनिक सुरक्षा उघडउघड धोक्यात आली असेल आणि कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याशी संपर्क साधणे शक्य नसेल तेव्हा, सशस्त्र सेनादलाचा कोणताही राजादिष्ट किंवा राजपत्रित अधिकारी अशा जमावास आपल्या हुकुमतीखालील सशस्त्र सेनादलाच्या मदतीने पांगवू शकेल आणि त्यातील घटक-व्यक्तींना, अशा जमावाची पांगापांग व्हावी यासाठी किंवा त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी यासाठी अटक करून बंदिवासात ठेवू शकेल; पण जर या कलमाखाली तो कार्य करत असताना कार्यकारी दंडाधिकाऱ्याशी संपर्क साधणे त्याला शक्य असेल तर, तो तसे करील आणि त्यानंतर पुढे आपण अशी कारवाई चालू ठेवावी किंवा नाही याबाबत दंडाधिकाऱ्याने दिलेल्या अनुदेशांचे पालन करील.