Bnss कलम १४९ : जमाव पांगविण्यासठी सशस्त्र सेनादलांचा वापर :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १४९ :
जमाव पांगविण्यासठी सशस्त्र सेनादलांचा वापर :
१) कलम १४८ च्या पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट, जर असा कोणताही जमाव अन्यथा पांगवणे शक्य नसेल आणि तो पांगला जावा हे सार्वजनिक सुरक्षेसाठी जरूरीचे असेल तर, जिल्हा दंडाधिकारी किंवा त्याच्या द्वारा प्राधिकृत कोणताही अन्य कार्यकारी दंडाधिकारी जो उपस्थित असेल तो सशस्त्र सेनादलांकरवी त्या जमावास पांगवू शकेल.
२) असा दंडाधिकारी सशस्त्र सेनादलांतील व्यक्तींच्या कोणत्याही गटावर हुकुमत असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्या हुकमतीखालील सशस्त्र सेनादलाच्या मदतीने तो जमाव पांगवण्यास, आणि त्यातील ज्या घटक-व्यक्ती कार्यकारी दंडाधिकारी निदेशित करील अथवा जमावाची पांगापांग व्हावी किंवा त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी यासाठी ज्यांना, अटक करून बंदिवासात ठेवणे जरूरीचे असेल अशा व्यक्तींना अटक करून बंदिवासात ठेवण्यास फर्मावू शकेल.
३) सशस्त्र सेनादलाचा असा प्रत्येक अधिकारी त्याला योग्य वाटेल अशा रीतीने अशा फर्मानाचे पालन करील, पण तसे करताना तो जमाव पांगण्यासाठी आणि अशा व्यक्तींना अटक करून स्थानबध्द करण्यासाठी योग्य तितकेच किमान बळ वापरील व कोणाच्याही शरीराला किंवा मालमत्तेला योग्य तितकीच किमान क्षती पोचवील.

Leave a Reply