भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ११ :
सार्वजनिक सुव्यवस्था व प्रशांतता राखणे :
(A) क) (अ) – बेकायदेशीर जमाव :
कलम १४८ :
मुलकी बळाचा वापर करून जमाव पांगवणे :
१) कोणताही कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी, किंवा अशा अंमलदार अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत उप निरिइकाहून खालच्या दर्जाचा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी कोणत्याही बेकायदेशीर जमावाला किंवा जिच्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग घडून येण्याचा संभव आहे अशा पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावाला पांगण्याचा हुकूम देऊ शकेल; आणि तदनुसार पांगणे हे अशा जमावातील व्यक्तीचे तदनंतरचे कर्तव्य असेल.
२) जर याप्रमाणे हुकूम झाला असताना कोणताही जमाव पांगला नाही किंवा याप्रमाणे हुकूम झाला नसताना, जेणेकरून न पांगण्याचा निर्धार दिसून येतो असे त्याचे वर्तन असेल तर, पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कार्यंकारी दंडाधिकाऱ्याला किंवा पोलीस अधिकाऱ्याला बळाने असा जमाव पांगवण्याचे काम सुरू करता येईल, आणि असा जमाव पांगवण्यासाठी व जरूर तर, त्यातील घटकव्यक्तींना, अशा जमावाची पांगापांग व्हावी किंवा त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी यासाठी अटक करून बंदिवासात ठेवण्यासाठी सशस्त्र सेनादलाचा अधिकारी किंवा सदस्य नसलेल्या व त्या नात्याने कार्य करत नसलेल्या कोणत्याही पुरूषाचे साहाय्य अधिकारपूर्वक मागता येईल.