Bnss कलम १४७ : निर्वाह खर्चाच्या आदेशाची अंमलबजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १४७ :
निर्वाह खर्चाच्या आदेशाची अंमलबजावणी :
निर्वाह-खर्चाच्या किंवा अंतरिम निर्वाहभत्ता आणि कार्यवाहीचा खर्च आदेशाची एक प्रत जिच्या बाजूने तो आदेश काढण्यात आला त्या व्यक्तीला किंवा तिचा कोणी पालक असल्यास त्याला किंवा ज्या व्यक्तीला निर्वाह भत्ता किंवा अंतरिम निर्वाहभत्ता व कार्यवाहीचा खर्च द्यावयाचा तिला विनाशुल्क दिली जाईल; कोणताही दंडाधिकारी ज्या व्यक्तीविरूध्द तो आदेश देण्यात आला ती जेथे असेल अशा कोणत्याही स्थळी, अशा दंडाधिकाऱ्याला पक्षांची ओळख पटल्यावर व देय भत्ता किंवा, यथास्थिती, खर्च दिलेला नसल्याची खात्री झाल्यावर अशा आदेशाची अंमलबजावणी करू शकेल.

Leave a Reply