भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १४६ :
भत्ता कमीअधीक करणे :
१) कलम १४४ अन्वये निर्वाहासाठी मासिक भत्ता किंवा मिळणाऱ्या किंवा त्याच कलमाखाली यथास्थिती, त्याच्या पत्नीला, मुलाला, बापाला किंवा आईला मासिक निर्वाह भत्ता देण्याचे आदेश मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या परिस्थितीत बदल झाल्याचे शाबीत झाल्यावर, दंडाधिकाऱ्याला त्याला योग्य वाटेल असे बदल मासिक निर्वाह भत्त्यात करता येतील.
२) जेथे सक्षम दिवाणी न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाचा परिणाम म्हणून, कलम १४४ खाली केलेला कोणताही आदेश रद्द करावा किंवा त्यात बदल करावा असे दंडाधिकाऱ्याला वाटेल तेथे, तदनुसार त्याला आदेश रद्द करता येईल किंवा, प्रकरणपरत्वे, त्यात बदल करता येईल.
३) ज्या स्त्रीला आपल्या पतीने घटस्फोट दिला आहे किंवा जिने त्याच्यापासून घटस्फोट मिळविला आहे तिच्या बाजूने कलम १२५ खाली कोणताही आदेश काढण्यात आला असेल तेव्हा जर दंडाधिकाऱ्याची अशी खात्री झाली की,
(a) क) (अ) अशा घटस्फोटाच्या दिनांकानंतर त्या स्त्रीने पुन्हा विवाह केला आहे, तर तो तिच्या पुनर्विवाहाच्या दिनांकी व तेव्हापासून असा आदेश रद्द करील;
(b) ख) (ब) त्या स्त्रीला तिच्या पतीने घटस्फोट दिला असून, त्या पक्षकारांना लागू असलेल्या रूढीप्राप्त किंवा व्यक्तिविषयक कायद्याअन्वये अशा घटस्फोटानंतर प्रदेय होणारी संपूर्ण रक्कम तिला मिळालेली आहे- मग ती सदर आदेशापूर्वी असो वा नंतर असो-तर- तो
एक) असा आदेश होण्यापूर्वी अशी रक्कम दिलेली असल्यास त्या बाबतीत असा आदेश झाल्याच्या दिनांकापासून,
दोन) अन्य कोणत्याही बाबतीत, पतीने त्या स्त्रीला प्रत्यक्षात काही काळापुरता निर्वाह खर्च दिला असल्यास तो कालावधी संपल्याच्या दिनांकापासून, असा आदेश रद्द करील;
(c) ग) (क) त्या स्त्रीने पतीपासून घटस्फोट मिळवला असून, आपल्या घटस्फोटानंतरच्या निर्वाहासंबंधीचे किंवा, यथास्थिती, अंतरिम निर्वाहासंबंधीचे आपले हक्क तिने स्वेच्छेने सोडून दिले आहेत, तर आदेशाच्या दिनांकापासून तो रद्द करील.
४) कलम १४४ अन्वये जिला निर्वाह भत्ता देण्याचा आदेश देण्यात आला असेल अशा कोणत्याही व्यक्तीने कोणताही व्यक्तीने कोणताही निर्वाह भत्ता किंवा हुंडा वसूल करण्यासाठी कोणताही हुकूमनामा काढताना, दिवाणी न्यायालय, उक्त आदेशानुसार अशा व्यक्तीला देण्यात आलेली किंवा तिने वसूल केलेली निर्वाह भत्त्याची किंवा यथास्थिती, ठोक रक्कम हिशेबात घेईल.
