भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १३९ :
बंधपत्राचा मजकूर (बंधपत्रातील अंतरभाग):
अशा कोणत्याही व्यक्तीने निष्पादित करावयाच्या बंधपत्राने किंवा जामीनपत्राने ती, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यास किंवा चांगली वागणूक ठेवण्यास बांधली जाईल, आणि यांपैकी दुसऱ्या बाबतीत कारावासाच्या शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे किंवा करण्यास अपप्रेरणा देणे हे कोठेही करण्यात आले तरी तो म्हणजे बंधपत्राचा किंवा जामीनपत्राचा भंग ठरेल.