भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १३८ :
ज्या कालावधीसाठी जामिन अपेक्षित आहे त्या कालावधीची सुरूवात :
१) कलम १२५ किंवा कलम १३६ खाली जिच्याबाबत जामीन आवश्यक करणारा आदेश काढण्यात आला असेल अशा कोणत्याही व्यक्तीला, असा आदेश काढण्यात आला त्या वेळी कारावासाची शिक्षा देण्यात आली असेल, किंवा त्या वेळी ती कारावासाची शिक्षा भोगत असेल तर, ज्या कालावधीकरता असा जामीन आवश्यक करण्यात आला असेल तो कालावधी अशी शिक्षा संपताच सुरू होईल.
२) अन्य प्रकरणी असा कालावधी, अशा आदेशाच्या दिनांकास सुरू होईल- मात्र दंडाधिकाऱ्याने पुरेशा कारणास्तव नंतरचा दिनांक निश्चित केला असेल तर तो अपवाद समजावा.