भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १३६ :
जामीन देण्याचा आदेश :
ज्या व्यक्तीबाबत चौकशी करण्यात आली असेल तिने बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करणे हे, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी जरूरीचे आहे असे अशा चौकशीअन्ती शाबीत झाले तर, दंडाधिकारी तदनुसार आदेश देईल:
परंतु-
(a) क) (अ) कोणत्याही व्यक्तीला, कलम १३० खाली केलेल्या आदेशात विनिर्दिष्ट केलेल्याहून निराळ्या स्वरूपाचा किंवा त्याहून मोठ्या रकमेचा किंवा त्याहून दीर्घततर कालावधीकरता जामीन देण्याचा आदेश दिला जाणार नाही;
(b) ख) (ब) प्रत्येक बंधपत्राची किंवा जामीनपत्राची रक्कम, प्रकरणाची परिस्थिती यथायोग्य लक्षात घेऊन निश्चित करण्यात येईल आणि ती अत्यधिक असणार नाही;
(c) ग) (क) जिच्याबाबत चौकशी करण्यात आली ती व्यक्ती बालक असेल तर, ते बंधपत्र तिच्या जामीनदारांकडूनच निष्पादित करण्यात येईल.