भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १३२ :
आरोपी हजर नसल्यास समन्स किंवा वॉरंट काढणे :
अशी व्यक्ती न्यायालयात हजर नसल्यास, दंडाधिकारी तिला उपस्थित राहण्यास फर्मावणारे समन्स अथवा अशी व्यक्ती हवालतीत असेल तेव्हा, ज्याच्या हवालतीत ती असेल त्या अधिकाऱ्याप्रत तिला न्यायालयासमोर आणण्याचा निदेश देणारे वॉरंट काढील :
पंरतु, पोलीस अधिकाऱ्याच्या अहवालावरून किंवा अन्य खबरीवरून (त्या अहवालाचा किंवा खबरीचा सारांश दंडाधिकाऱ्याने नमूद करावयाचा) शांतताभंग केला जाईल असे भय वाटण्यास कारण असून, अशा व्यक्तीस तात्काळ अटक करण्याव्यतिरिक्त अन्य मार्गाने अशा शांतताभंगास प्रतिबंध करणे शक्य नाही असे जेव्हा केव्हा अशा दंडाधिकाऱ्याला दिसून येईल तेव्हा, तो दंडाधिकारी कोणत्याही वेळी तिच्या अटकेसाठी वॉरंट काढू शकेल.