Bnss कलम १२८ : संशयित व्यक्तीकडून चांगल्या वागणूकीसाठी जामीन :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १२८ :
संशयित व्यक्तीकडून चांगल्या वागणूकीसाठी जामीन :
जी व्यक्ती गुप्तपणे वावरण्याची खबरदारी घेते अशी एखादी व्यक्ती आपल्या स्थानिक अधिकारितेत आहे आणि दखलपात्र अपराध करण्याच्या हेतूने ती तसे करीत आहे असे समजण्यास कारण आहे अशी जेव्हा एखाद्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याला खबर मिळेल तेव्हा, यात यापुढे उपबंधित केलेल्या रीतीने तो दंडाधिकारी, त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त एक वर्षांच्या कालावधीपुरते अशा व्यक्तीने चांगली वागणूक ठेवण्यासाठी, बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करण्याचा आदेश तिला का देऊ नये. याचे कारण दाखविण्यास त्या व्यक्तीला फर्मावू शकेल.

Leave a Reply